केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी केंद्र १ कोटी १० लाख सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय कॅबिनेटने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्ता (DA) हा पाच टक्के इतका वाढणार असल्याने सद्यस्थितीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ९०० ते १२ हजार ५०० इतकी वाढ होणार आहे.

 

यापूर्वी केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढ ही जानेवारी २०१९ रोजी केली होती. ही वाढ केवळ तीन टक्के इतकीच होती. सर्व सरकारी अधिकाऱ्यांचा सध्याचा महागाई भत्ता हा १२ टक्के आहे. या निर्णयाचा थेट फायदा हा ५० लाख सरकारी कर्मचारी आणि ६२ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, या निर्णयामुळे सरकारवर एकूण १६ हजार कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@