दोन हजारांची नोट बंद होणार का ? वाचा आरबीआय काय म्हणते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2019
Total Views |



नवी दिल्ली : तुमच्याकडे दोन हजारांची नोट असेल तर ती आत्ताच खपवा, असे व्हायरल मेसेज गेल्या काही दिवसांत तुम्हालाही मिळाले असतील. दोन हजारांची नोट एटीएममधून बाहेर येण्यास अडचण येत असल्याने त्याऐवजी आता आरबीआय एक हजाराची नवी नोट आणणार असल्याचेही या मेसेजमध्ये सांगण्यात आले असेल पण खरेच दोन हजारांची नोट बंद होणार आहे का ? तुमच्याकडे असलेल्या दोन हजारांच्या नोटा तुम्हाला बदलाव्या लागणार आहेत का ? वाचा सविस्तर...




 

 

नोटाबंदीनंतर आरबीआयने दोन हजारांची नोट बाजारात आणली होती. आरबीआयने दोन हजारांची नोटही काहीकाळासाठीच बाजारात आणली आहे, अशा अफवा त्यावेळीही पसरवण्यात आल्या होत्या. दोन हजारांच्या नोटेमुळे सुट्टे पैशांची चणचणही त्यावेळेस भासत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांची नोट बंद होणार असल्याच्या बातम्या बऱ्याच वृत्तवाहिन्यांनी चालवल्या. तसेच १० दिवसांत केवळ ५० हजारांच्या नोटा बदलता येणार असल्याचेही या मेसेजमध्ये सांगण्यात आले होते. त्यामुळे या नोटेबद्दल पुन्हा एकदा संभ्रम पसरला होता. मात्र, आता आरबीआयने यावर एक स्पष्टीकरण दिले आहे.

 

आरबीआयतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर फिरणारा तो मेसेज खोटा आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरबीआयने केले आहे. तसेच मेसेजमध्ये म्हटल्याप्रमाणे एक जानेवारीपासून कोणत्याही प्रकारची नवी नोट चलनात येणार नसल्याचे स्पष्टीकरणही आरबीआयने दिली आहे. सध्याच्या चलनी नोटांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@