व्हॉट्सॲपद्वारे निवडणूक प्रचार करणाऱ्यांना येणार नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2019
Total Views |
 


सोशल मीडियावरील पुढाऱ्यांना चाप



मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराचा धुरळा आता सोशल मीडियावरही उडू लागला आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी फेसबूक, व्हॉट्सॲप ग्रुप आणि इन्स्टाग्रामसारख्या माध्यमांवरही नेते मंडळी झळकू लागली आहेत. आपल्या प्रचाराचे व्हीडिओ कामांची माहीती आणि विरोधकांवर टीका हे सारंकाही आता सोशलमीडियावर दिसू लागल्याने निवडणूकीच्या मुद्द्यावर गरमागरम चर्चा रंगली आहे. मात्र, अशावेळी कोणताही गैरप्रकार किंवा बदनामीकारक मजकूर ग्रुपवर फिरू लागल्यास पोलीसांकडून अॅडमिनला नोटीस बजावण्यात येणार आहे.

 

कार्यकर्त्यांचा हा व्हायरल प्रचार उमेदवारालाही महागात पडू शकतो. प्रचारासाठी अपुरा वेळ असल्‍याचे लक्षात घेत मतदारापर्यंत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांकडून डिजिटल मोहिमाही सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, अशावेळी एखादा आक्षेपार्ह किंवा भावना भडकवणारा मजकूर ग्रुपवर दिसल्यास किंवा त्याबद्दल तक्रार झाल्यास पोलीसांकडून थेट कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशाप्रकारेचे संदेश न पाठवण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

 

एखाद्या मुद्द्यावर नेटकऱ्यांचे समर्थन आणि विरोध होऊ शकते. मात्र, आक्षेपार्ह मजकूरामुळे समाजात तेढ निर्माण होण्याचे प्रकार यापूर्वीही झाल्याने आता पोलीसांकडून विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे प्रकार उघडकीस आल्याने पोलीसांनीही दक्षता बाळगण्यास सुरुवात केली आहे. व्‍हॉट्‌सॲप वापरणार्‍यांनी व त्‍यावरील ॲडमिननी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे मत पोलीसांनी व्यक्त केले आहे.

 

नोटीस पाठवल्यावर काय कारवाई ?

एखादा आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर पसरवल्यास पोलीसांकडून तूर्त नोटीशीमार्फत समज दिली जाते. समाजव्यवस्था बिघडू नये यासाठी अशाप्रकारचे संदेश पसरवणाऱ्यालाही नोटीस पाठवण्यात येते. तक्रारदाराने व्‍हॉट्‌सॲप ग्रुपवर भावना दुखावल्‍याची तक्रार घेवून आल्‍यास पोलिस दखलपात्र किंवा अदखलपात्र अशा दोन्ही स्वरुपाचे गुन्हे दाखल करणार आहेत. दखलपात्र गुन्‍ह्यामध्ये दंगलीसारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे. त्यामुळे व्हॉट्असप पुढाऱ्यांना आता चाप बसणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@