'या' तीन शास्त्रज्ञांना भौतिक क्षेत्रात संयुक्त नोबेल पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2019
Total Views |



नवी दिल्ली : भौतिकशास्त्र क्षेत्रामधील नोबेल २०१९ पुरस्कार जाहीर झाला आहे. यावेळी भौतिकशास्त्रातील योगदानाबद्दल तीन शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार घोषित करण्यात आले. शास्त्रज्ञ जेम्स पीबल्स यांना ब्रह्मांडातील विज्ञान यावर नवीन सिद्धांत मांडल्यामुळे, तर शात्रज्ञ मिशेल मेयर आणि डिडिएर क्वेलोझ सौरमंडळाच्या पलीकडे आणखी एका ग्रहाचा शोध लावल्याबद्दल यांना संयुक्तपणे पुरस्कार देण्यात आले आहेत.

 

जेम्स पीबल्स हे मुळचे कॅनेडियन-अमेरिकन नागरिक आहेत. त्यांनी बिग बॅंग, डार्क मॅटर आणि डार्क एनर्जीवर त्यांनी केलेली कामे आधुनिक विश्वविज्ञानाचा आधार मानली जातात. मिशेल आणि डीडीयर यांनी ५१ पेगासी बी या ग्रहाचा शोध लावला. विविध वायूंपासून बनलेला हा ग्रह पृथ्वीपासून ५० वर्ष एका ताऱ्याची परिक्रमा करत आहे

@@AUTHORINFO_V1@@