इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात निर्मलाताईंमुळे महायुतीचेच पारडे जड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2019
Total Views |

-


लोकसभा निवडणुकीत भाजप सेनेला झालेल्या मतदानापैकी बरेच मतदान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे वळते असा अनुभव आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले आहे. कोणतीही लाट असली तरी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघात लाटेचा प्रभाव नसतो असे आजवर दिसून आले असले तरी, यंदाच्या निवडणुकीत गावित यांनी बांधलेले शिवबंधन येथे भगवा फडकावेल अशी अटकळ बांधली जात आहे.



वनवासी बहुल असणार्‍या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी १२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तीन अपक्ष उमेदवार प्रकाश काळू गदिवे, बाळू त्र्यंबक मेंगाळ, जयराम नारायण भुसारे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आहे. त्यामुळे चार अधिकृत पक्षीय उमेदवार व पाच अपक्ष यांच्यात ही लढाई होणार आहे. शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार निर्मला गावित व काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्यात चुरशीची लढाई होणार असली तरी मनसेने नाशिकचे नगरसेवक योगेश शेवरे व वंचित बहुजन आघाडीचे लकी ( लक्ष्मण) जाधव यांचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. याबरोबरच अपक्ष म्हणून शैला झोले, दत्तात्रेय नारळे, विकास शेंगाळ, शिवराम खाने, यशवंत पारधी असे नऊ उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत.




गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराच्या गळ्यात आमदारकी देणारा इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ आहे
. विद्यमान आमदार निर्मला गावित त्या सलग दोनवेळा निवडून आल्या आहेत. तिसर्‍यांदा आमदारकीची माळ घेण्यासाठी त्यांनी शिवबंधन घालून शिवसेनेची उमेदवारी मिळवली आहे. तालुक्याचे वातावरण पाहता जि.प. व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने सरशी मारली व पंचायत समितीवर एकहाती सत्ता काबीज केली. तसेच इगतपुरी नगर परिषदेवरही सेनेची सत्ता आहे. गत पंचवार्षिक मतांच्या विभागणी मोठ्या प्रमाणात झाल्याने शिवसेनेचे शिवराम झोले यांना निसटता पराभव पचवावा लागला होता. राष्ट्रवादीच्या हिरामण खोसकर यांनी तिसर्‍या क्रमांकाची मते मिळवली होती, तर काशिनाथ मेंगाळ यांनी अपक्ष निवडणूक लढवून चौथ्या क्रमांकाची मते मिळवली होती. भाजपनेही चंद्रकांत खाडे यांच्या उमेदवारीने लढत देण्याचा प्रयत्न केला होता. ही सर्व पार्श्वभूमी पाहता विद्यमान आमदारांना फायदा होण्यासाठी मतांचे विभाजन हा प्रमुख मुद्दा ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

 



२०१४
प्रमाणे यंदाही गावित विजयी होणार?


काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर शिवसेना-भाजपची युती आहे. आघाडीने इगतपुरी त्र्यंबकेश्वरची जागा काँग्रेसला सोडलेली आहे, तर युतीने शिवसेनेला सोडलेली आहे. दोन वेळा शिवसेनेला पराभव पत्करावा लागला आहे.निर्मला गावित यांनी पाच वर्षात मतदारसंघातील प्रत्येक गावात काहीना काही काम केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहून दोन वर्षे आधीच पूर्वतयारी केलेली आहे. जातीय राजकारण विकोपाला गेल्याचे जाऊन प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार लढा देतात. उमेदवारांची संख्या पाहता विजयासाठी मतांचे विभाजन घातक ठरण्याची शक्यता आहे. उमेदवारांची संख्या कमी करून मतांची गळती रोखण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी विविध नीतीचा वापर सुरू केला असल्याचे येथे दिसून येत आहे. विद्यमान आमदारांना फायदा होणारे मत विभाजन रोखणे सोपे नसले तरी त्यादृष्टीने येथे उमेदवारांकरवी काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.

- समीर पठाण 
@@AUTHORINFO_V1@@