भारतीय महिलांची आफ्रिकेवर मात ; द. आफ्रिकेची दाणादाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात आफ्रिकेवर ८ गडी राखून सहज विजय मिळवला. आफ्रिकेने दिलेले १६४ धावांचे आव्हान भारतीय संघाने ४१. ४ षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. प्रिया पुनिया आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने ३ सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

 

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला. प्रथम फलंदाजी करताना लॉरा वोल्व्हार्ट आणि मॅरीझन्ने कॅप्प वगळता आफ्रिकेच्या अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. लॉरा वोल्व्हार्टने ३९ धावा केल्या तर, मॅरीझन्ने कॅप्पने ५४ धावांची खेळी केली. आफ्रिकेचा डाव ४५.१ षटकात १६४ धावांवर संपुष्टात आला. भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने ३ विकेट्स घेतल्या. तसेच, शिखा पांडे, एकता बिस्त, आणि पूनम यादवने प्रत्येकी २ विकेट्स घेऊन उत्तम साथ दिली.

 

आफ्रिकेच्या १६४ धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी अर्धशतकी सलामी दिली. जेमिमा रॉडिग्जने ५५ धावांची खेळी केली. तर स्मृती मानधनाच्या जागी संधी मिळालेल्या प्रिया पुनियाने अर्धशतक झळकावले. संघाची धावांची १२८ असताना पूनम राऊत १६ धावांवर बाद झाली. यानंतर प्रिया आणि मिताली राज यांनी कोणतेही नुकसान न होऊ देता संघाला विजय मिळवून दिला. प्रिया पुनियाने नाबाद ७५ धावा केल्याआणि मिताली (११) धावांवर नाबाद राहिल्या. पहिलाच आंतरराष्ट्रीय सामन्यात १२४ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ७५ धावांची खेळी करणाऱ्या प्रिया पुनियाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@