विस्थापित काश्मिरी कुटुंबांना केंद्र सरकारची मोठी मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2019
Total Views |



नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात विस्थापित झालेल्या कुटुंबियांना केंद्र सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून ५३०० कुटुंबे भारतात विस्थापित झाली आहेत. या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून ५.५ लाखांचा मदतनिधी जाहीर केला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, "पाकव्याप्त काश्मीरमधील ५३०० कुटुंबे भारतातील विविध भागात वास्तव्यास आहेत. अशा कुटुंबाना केंद्र सरकार ५.५ लाखांची मदत देणार आहे."


केंद्रीय मंत्रिमंडळात विस्थापित काश्मिरीच्या पुनर्वसनासाठी हा भत्ता जाहीर केला
, तर या यादीमध्ये ५३०० कुटुंबांचा समावेश असेल. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके)पासून विस्थापित झालेले अनेक कुटुंब भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थायिक झाले आहेत. या ५३०० काश्मिरी कुटुंबांना केंद्र सरकारने दिवाळी भेट दिली आहे. आता या कुटुंबांना केंद्राकडून साडेपाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल जेणेकरून ते काश्मीरमध्ये स्थायिक होऊ शकतील. विस्थापितांच्या यादीमध्ये सुरुवातीला या ५३०० कुटुंबांच्या नावाचा समावेश नव्हता, परंतु आता सरकारने निर्णय घेतला आहे की त्यांची नावेही या यादीमध्ये समाविष्ट केली जातील आणि त्यांना आर्थिक मदत दिली जाईल.

 

 


या ५३०० कुटूंबात तीन प्रकारची कुटुंबे आहेत
, त्यापैकी काही लोक १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी आले होते, काही काश्मीरच्या विलीनीकरणानंतर आणि काही पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून भारतात आले होते. ही कुटुंबे काश्मीरमधील राज्यात स्थायिक झाली. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीओकेमधून आलेल्या या लोकांना ५.५ लाख रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती, परंतु त्यानंतर यादीत नाव नसल्याने या ५३०० कुटुंबांना लाभ मिळू शकला नाही. आता या कुटुंबांनाही ही मदत देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी हा निधी दिला जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@