जम्मू काश्मीरमधून '३७०' हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय : चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2019
Total Views |



पुणे : जम्मू-काश्मीरमधून '३७० कलम' हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय असून, आम्ही आमच्या ३० मिनिटांच्या भाषणात पाच मिनिटे बोललो तर त्यात गैर काय? किंबहुना राष्ट्रीय अस्मितेचा आनंद व्यक्त केल्याने नागरिकांचादेखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे," असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पुण्यामध्ये 'कलम ३७०' आणि '३५ ए' या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लडाखचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल, पुण्याचे खासदार गिरीश बापट, कार्यक्रमाचे आयोजक शेखर मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते.

 

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, "जम्मू-काश्मीरमधून 'कलम ३७०' हटवणे हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. या विषयासाठी जनसंघाचे संस्थापक आणि आमचे मार्गदर्शक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 'एक देश मै दोन निशान, दो संविधान नही चलेगा'चा नारा देत बलिदान दिले. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा झेंडा फडकवणयासाठी आंदोलने केली. यासाठी तुरुंगवास भोगला." ते पुढे म्हणाले की, "अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आम्ही जम्मू-काश्मीरमधून '३७०' हटवण्यासाठी आंदोलन केले. हे आंदोलन माझ्या नेतृत्वाखाली झाले होते. पण यावेळी आम्हाला अटक झाली होती. यानंतर आम्ही तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांची भेट घेऊन तिरंगा झेंडा भेट दिला आणि तुम्ही तरी हा झेंडा श्रीनगरच्या लाल चौकात फडकवा, अशी विनंती केली होती. आता हाच विषय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सोडवला. आमच्या ३० मिनिटांच्या भाषणात त्याचा आनंद साजरा करणे, यात गैर काय?" असा सवाल उपस्थित केला.

 

"काश्मीरमधील या भारतीय अस्मितेच्या मुद्द्याला सर्व घटकांमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या आनंदामध्ये सहभागी पुण्याची संधी यानिमित्ताने आम्हाला मिळत आहे," असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. लडाखचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल म्हणाले की, "जम्मू-काश्मीरमधून 'कलम ३७०' आणि '३५ ए' हटवल्यानंतर अनेकांना मानवतावादाचे धुमारे फुटले आहेत. मुंबई-दिल्लीतील अनेक तथाकथित बुद्धिजीवी सरकार कशाप्रकारे येथील जनतेची मुस्कटदाबी करत आहे, यावर नक्राश्रू ढाळत आहेत. पण '३७०' आणि '३५ ए'मुळे येथील जनता जेव्हा नरकयातना सहन करत होती, त्यावेळी हे बुद्धिजीवी गप्प का होते? त्यांना जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील जनतेच्या यातना दिसल्या नाहीत का?" असा सवाल उपस्थित करून काँग्रेसप्रणीत युपीए सरकारच्या काश्मीर संदर्भातील बोटचेप्या धोरणाची पोलखोल केली.

@@AUTHORINFO_V1@@