काँग्रेसला राफेलची पूजाही खुपतेय! : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2019
Total Views |



कैथल
: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राफेल मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला केला असून काँग्रेसने आता राफेलच्या पूजेलाही विरोध सुरू केला
. तसंच काँग्रेस कलम ३७०च्या बाजूने आहे की विरोधात? हे स्पष्ट करावे, असे म्हटले आहे.


संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्स दौर्‍यात मंगळवारी भारताला देण्यात येणार्‍या पहिल्या राफेल विमानाची विधीवत पूजा केली
. यावरून काँग्रेसने केंद्र सरकारला टीकेचे लक्ष्य केले. या टीकेला अमित शाह यांनी हरियाणाच्या कैथल येथे आयोजित केलेल्या सभेतून प्रत्युत्तर दिले आहे. “संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल राफेलचे शस्त्रपूजन केले. काँग्रेसला हे आवडले नाही. विजयादशमीला आपण शस्त्रपूजन करतो ना? मग टीका करताना काँग्रेसने याचे भान राखायला हवे,” असे अमित शाह म्हणाले.


“राफेल विमान हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. यामुळे आपल्या देशाची सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. राफेल विमान हे हल्ल्यासाठी नाही तर आत्मरक्षणासाठी आहे,” असे शाह यांनी स्पष्ट केले. “विजयादशमीला शस्त्रपूजनाची परंपरा आहे. हे शस्त्रपूजन म्हणजे चांगल्याची वाईटावर मात. तरीही काँग्रेसचा या शस्त्रपूजनाला विरोध का?,” असा सवाल शाह यांनी केला. “महाराष्ट्र, हरियाणात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत कुठल्या मुद्द्यावरून सरकारला घेरावे, हे अजूनही विरोधकांना सुचत नाहीय. विरोधक दिशाहीन झालेत,” अशी टीका अमित शाह यांनी केली.


दरम्यान
, राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाची पूजा केल्यावर काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला. “कुठलेही ठोस काम न करता प्रत्येक गोष्टीत ड्रामा करण्यात या सरकारचा हातखंडा आहे,” असं दीक्षित म्हणाले, तर “असा तमाशा करण्याची गरज नव्हती. आम्ही बोफोर्स तोफा खरेदी केल्या पण, त्या आणण्यासाठी कुणी गेले नव्हते. पण हे मंत्री जातात, दिखावा करतात आणि विमानातही बसतात,” अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली होती.

@@AUTHORINFO_V1@@