'मोदींनी कलम ३७० हटवून संपूर्ण देशाला एक केले.'- अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2019
Total Views |




परळी
: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भगवान बाबांची आरती करत उपस्थित जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना पंकजा मुंढे म्हणाल्या, " भक्तांची जमलेली गर्दी हि भविष्याची दिशा बदलेल, मतांसोबतच जनतेची मनंही आम्हाला जिंकायची आहेत. अमित शाह यांच्या नेतृत्वात काम करत, गोपीनाथ मुंडेंचे काम पुढे सुरु ठेवायचे आहे. आज माझ्या संघर्षाला तुम्ही कौतुकाची थाप दिली. " अशा शब्दांत त्यांनी जनतेचे आभार मानले.



यावेळी जनतेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले
, "नरेंद्र मोदींनी कलम ३७० हटवून संपूर्ण देशाला एकत्र केले. सत्तर वर्षे सत्तेत असणाऱ्या पक्षांनी ओबीसी साठी काय केले? असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. ओबेसी आयोगाची स्थापन मोदी सरकारच्या काळात झाली. मोदी सरकार सदैव वंचितांसाठी काम करत आहे. त्यामुळे कलम ३७० हटविल्यानंतर विरोध करणार्यांना जाब विचार असे आवाहन अमित शाह यांनी केले. तसेच, भगवान बाबानी लोकांसाठी आयुष्य वेचले. शिक्षणाचे विचार रुजवले. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेवत पंकजा मुंढे काम करत आहेत."असे अमित शाह म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@