'आरे'संबंधी पर्यावरणवाद्यांच्या उद्देशांवर संशय ; दादरमध्ये पोस्टर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2019
Total Views |



 

 

मुंबई ( प्रतिनिधी) - 'उत्तर दे ! झोरू बथेना' असे म्हणत आरेमधील वृक्षतोडीविरोधातील याचिकाकर्ते झोरु बथेना यांच्या उद्देशांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे फलक दादर येखील खोदादाद चौकात लावण्यात आले आहे. आरेतील २,७०० झाडांवर हायकोर्टात स्टे का मागितला नाही ?, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १५ दिवस झाडे तोडता येणार नसल्याची थाप का मारली ? असे प्रश्न या फलकाच्या माध्यमातून विचारण्यात आले आहेत. हा फलक या ठिकाणी लावणाऱ्यांविषयी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, फलकावर पर्यावरणप्रेमी जाब विचारत आहेत, असा संदेश लिहण्यात आला आहे. त्यामुळे आरेमधील 'मेट्रो-३' कारशेडविरोधी उभ्या राहिलेल्या चळवळीवर आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

 
 

आरेमधील 'मेट्रो-३' कारशेडसाठीच्या वृक्षतोडीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली. यापूर्वी उच्च न्यायालयाने 'आरे' आणि 'मेट्रो-३' च्या कारशेडला विरोध करणाऱ्या सर्व याचिका फेटाळल्या होत्या. यामध्ये आरेला वनाचा दर्जा देणे आणि कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधातील याचिकांचा समावेश होता. 'मेट्रो-३'च्या कारशेडसाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांना विरोध करणारी याचिका वृक्षप्रेमी झोरू बथेना यांनी न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने बरखास्त केली. मात्र, या याचिकेच्या सुनावणीदरम्यान बथेना यांनी वृक्षतोडीवर स्थगिती आणण्याची मागणी न्यायालयासमोर केली नाही. शिवाय न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर 'मेट्रो-३' प्रशासन १५ दिवस झाडे तोडू शकत नाही, असा दावा त्यांनी केला. मात्र, यार्चिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाईपर्यंत वृक्षतोडीवर कोणत्याही प्रकारची स्थगिती नसल्याने 'मेट्रो-३' प्रशासनाने झाडे तोडून टाकली.

 

त्यामुळे बाथेना यांच्या नेमक्या उद्देशावर सवाल उपस्थित करणारे फलक अज्ञातांकडून दादर पू्र्व येथील चौकात लावण्यात आले आहेत. 'उत्तर दे ! झोरु बाथेना. आरेतील २,७०० झाडांवर हायकोर्टात स्टे का मागितला नाही ? लोकांची दिशाभूल करुन २९ लोकांना तुरुंगात जावे लागले. कुठे गेल्या तुझ्या १५ दिवसाच्या झाडे तोडू न शकण्याच्या थापा ? पर्यावरणप्रेमी जाब विचारत आहेत', असा आशय फलकावर लिहण्यात आला आहे. एकूणच आरेतील 'मेट्रो-३' कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणवाद्यांच्या उद्देशांवर या फलकाच्या माध्यमातून बोट ठेवण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@