पूर्ववैमनस्यातून अंदाधुंद गोळीबार: भाजप नगरसेवकासह चार जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2019
Total Views |




जळगाव : भाजप नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरात घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात रवींद्र खरात यांच्यासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना भुसावळमध्ये घडली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असून हत्याकांडातील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

या प्रकरणी हत्याकांडाच्या कारणांचा आणि आरोपींचा शोध पोलीस आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यात रवींद्र खरात यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला.

 

रवींद्र खरात हे त्यांच्या आंबेडकर नगर परिसरातील घरात बसले असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी घरात प्रवेश केला. चाकू, दगड, विटा यांच्या सहाय्याने खरात कुटुंबावर हल्ला केला. खरात कुटूंबियांनी याचा प्रतिकार केला. दरम्यान दुचाकीवरून आलेल्या एकाने बंदुकीतून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यामध्ये नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह चार जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यातील तिघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर रवींद्र खरात यांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

दरम्यान, भुसावळसह जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये नगरसेवक रवींद्र खरात त्यांचे बंधू सुनील खरात, मुलगा प्रेमसागर आणि रोहित खरात आणि त्यांचा मित्र सुमित गजरे या पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेत पोलिसांनी तीन संशयित आरोपीना तातडीने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून या घटनेतील कारणांचा आणि आरोपींचा शोध आता पोलीस घेत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@