स्त्री-रोगतज्ज्ञांची पहिली राष्ट्रीय आयुर्वेद परिषद मुंबईत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2019
Total Views |
 


देशभर आयुर्वेद उपचाराच्या योजना कार्यान्वित करणार : श्रीपाद नाईक 


मुंबई : भारतीय चिकित्सा क्षेत्रात आयुर्वेदाला अग्रस्थान देण्यासाठी तसेच योगसारख्या प्रकारातून आरोग्य जोपासण्याचा प्रचार अशा विविध माध्यमातून केंद्र सरकार प्रयत्नशील राहणार असून हा एक राष्ट्रीय आयुष मिशनचा भाग राहिल तसेच या अंतर्गत विविध योजनादेखील संपूर्ण देशभर कार्यान्वित करण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

 

कश्यपी आयुर्वेदिक गायनॅकॉलॉजिक अँड ऑबस्ट्रेशिअन फाऊंडेशनच्या (कागोफ) वतीने भारतीय स्त्री रोगतज्ज्ञांची पहिली राष्ट्रीय आयुर्वेद परिषद वरळी येथील रा. आ. पोदार महाविद्यालयात आयोजित करण्यात आली असून त्यानिमित्ताने ते बोलत होते. कागोफच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय परिषदेत वैद्यराज व्हिजन, आयुर्वेद विज्ञान मंडळ, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, एमयुएचएस या संस्थादेखील सहभागी झाल्या आहेत. देशभरातील आयुर्वेदातील मान्यवर अभ्यासक, संशोधक या परिषदेत सहभागी झाले.

 

याप्रसंगी मराठी विश्वकोश मंडळाचे दिलीप करंबळेकर, आयुष महाराष्ट्राचे कुलदीपराज कोहली, पोदार महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. गोविंद यादवराव खटी, आयुर्वेद एम्सच्या राष्ट्रीय परिषद सदस्या डॉ. सुजाता कदम, कागोफच्या महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुजाता देवईकर, या परिषदेचे संयोजक डॉ. सुभाष मार्लेवार, डॉ. समीर घोलप, डॉ. अमृता मिश्रा, डॉ. प्रिया वालवटकर, डॉ. विशाला तुर्लापती, डॉ. रुजुता दुबे तसेच राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या अध्यक्षा डॉ. व्हीएनके उषा, डॉ. सुजाता कदम, डॉ. रविंदर हेदेखील याप्रसंगी उपस्थित होते.




 

मराठी विश्वकोश मंडळाचे दिलीप करंबळेकर यांनी गर्भसंस्कार ते अंत्यसंस्कार हे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा विचार करणारी भारतीय संस्कृती सुजाण व सुप्रजातीसाठी विचार करते, त्यामुळेच आशियातील कुटुंबियांचा प्रभाव जागतिक कारभारात वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये विविध माध्यमातून दिसून येतो. म्हणूनच अशी पिढी घडविण्यासाठी जन चळवळ जाणीवपूर्वक उभारण्याची गरज असल्याचे सांगितले.

 

आयुर्वेदाच्या डॉक्टरांनी आपण उत्तम वैद्य कसे होऊ, याचा निर्धार केला पाहिजे तसेच उपचाराची स्वतःची पद्धतीदेखील विकसित केली पाहिजे, तरच आयुर्वेदाला अधिक बळकटी येईल तसेच जनमानसातदेखील त्याचा अवलंब करण्यावर भर पडेल, असे विचार आयुष महाराष्ट्राचे कुलदीपराज कोहली यांनी व्यक्त केले.

 

या परिषदेत आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रसूती तसेच बालकांचे आरोग्य या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. डॉ. बनवारीलाल गौड व डॉ. एन. आर. भांगळे यांना आयुर्वेदभूषण पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. आयुर्वेदात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कृष्णा मित्रा, प्रदीप बाबर, विजय माने, संजय लोंढे, कौशलकुमार सिंग, संजय चिट्टे यांना यावेळी विशेष सन्मानित करण्यात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ड़ॉ. सुजाता देवईकर यांनी केले तर आभार पोदार महाविद्यालयाचे अधीक्षक गोविंद खटी यांनी मानले. सूत्रसंचालन अमृता मिश्रा यांनी केले. डॉ. जय मेहता, डॉ. कल्पना आपटे, ड़ॉ. मंदार रानडे, डॉ. हरी यांनीही या परिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

@@AUTHORINFO_V1@@