व्यापार युद्धाचा फटका : एचएसबीसीमुळे भारतातील 'इतक्या' नोकऱ्या जाणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2019
Total Views |



मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या झळांमुळे आता भारतातील रोजगारांवरही टांगती तलवार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज बॅंक, अशी ओळख असलेल्या 'एचएसबीसी'कडून जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे. हा आकडा जागतिक पातळीवरील आहे. दरम्यान, भारतातील आकडा दीडशे इतका आहे. काही आठवड्यांपूर्वीच बॅंकेच्या बड्या अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. जागतिक बाजारातील मंदीचा हवाला देत एकूण चार हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णयही जाहीर केला होता.

 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात चीन आणि अमेरिकेत सुरू असलेले व्यापार युद्ध आणि बॅंकांकडून केले जाणारे व्याजदर कपात यामुळे बॅंकेसमोर अडचणी वाढत आहेत. बॅंकेचे नवे अध्यक्ष नोएल क्विन यांनी खर्चातील कपातीवर जास्त भर दिला आहे. या मोहिमेअंतर्गत एकूण १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. यात गलेगठ्ठ पगार असलेल्या अधिकाऱ्यांचा सामावेश आहे. या कर्मचाऱ्यांवर कंपनीची मोठी रक्कम खर्च होत असल्याचा दावा बॅंकेने केला आहे. त्यानुसार पुणे आणि हैदराबाद येथील बॅंकेच्या शाखांतील दीडशे कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे. दरम्यान भारतात आणखी किती कर्मचारी कपात होणार याबद्दल अद्याप एचएसबीसीने कोणतिही प्रतिक्रीया दिलेली नाही.

 

दरम्यान, भारत आणि आशियातील व्यापाराबद्दल कंपनी व्यवस्थापन समाधानी असल्याचे दिसते. मात्र, युरोपात सुरू असलेल्या व्यापारातून परतावा येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एचएसबीसीचे मुख्यालय लंडन येथे आहे. दरम्यान, अन्य आंतरराष्ट्रीय बॅंकांनीही कर्मचारी कपातीचे पाऊल उचलले आहे. देशातील सर्वात दुसरी मोठी बॅंक, अशी ओळख असलेल्या कॉमर्जबॅंकेने ४ हजार ३०० कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला होता. हा आकडा एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेच्या १० टक्के इतका आहे.

@@AUTHORINFO_V1@@