अपक्ष उमेदवार आशिष कांटे यांचा चंद्रकांतदादांना पाठींबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2019
Total Views |

 

 
 
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आशिष कांटे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत, विकासाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहण्यासाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
 

आशिष कांटे यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन, तसेच विकासाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य अग्रेसर राहण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन भारतीय जनता पक्ष, शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

 

यावेळी आशिष कांटे यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील कांटे यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देत पक्षात स्वागत केले. कांटे यांच्या पक्ष प्रवेशाबद़दल बोलताना पाटील म्हणाले की, "देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीने प्रभावीत होऊन अनेक तरुण भारतीय जनता पक्षात सक्रिय काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यानुसार आशिष कांटे यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पक्षात स्वागत करतो."

@@AUTHORINFO_V1@@