कलेला भाषेची मर्यादा नसते, आणि संगीताला कसलीच मर्यादा नसते या दोन्ही गोष्टी खऱ्या ठरवत बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेता विकी कौशल याने 'जगनं हे न्यारं झालं जी' हे गाणे सोशल मीडियावर शेअर करत गाण्याचे विशेष कौतुक देखील केले. सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत असलेल्या हिरकणी या आगामी चित्रपटातील 'जगनं हे न्यारं झालं जी' हे नवीन गाणे आज प्रदर्शित झाले.
Listen to this lovely song जगनं हे न्यारं झालं जी from #Hirkani, it's an absolute gem. I am privileged to launch this lovely rendition. Looking forward to this heroic journey of a mother this DIWALI@mapuskar_rajesh@prasadoak17
— Vicky Kaushal (@vickykaushal09) October 7, 2019
@amitraj819
@mesonalee16https://t.co/yzFumtwaIg pic.twitter.com/NrxYNZSUoz
'प्रत्येक आई असतेच हिरकणी' या चित्रपटाच्या टॅगलाईनला अगदी साजेसे असे हे गाणे अमितराज आणि मधुरा कुंभार या दोघांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे. तर अमितराज यांनीच हे गाणे संगीतबद्ध केले आहे. त्याचबरोबर या गाण्याचे अतिशय अर्थपूर्ण शब्द संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिले आहेत.
'जगनं हे न्यारं झालं जी' या गाण्यात हिरकणीच्या सुखी संसाराची, तिच्या ममतेची, लाघवी स्वभावाची एक छोटीशी झलक पाहायला मिळते. गाण्याच्या चित्रीकरणासाठी वापरलेली लोकेशनसुद्धा अतिशय निसर्गरम्य असल्यामुळे गाण्याला एक वेगळाच दर्जा निर्माण झाला आहे.