'लाल कप्तान' च्या पोस्टरमधील रावण कोण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2019
Total Views |


'लाल कप्तान' या सैफ अली खानच्या आगामी चित्रपटाचे आणखी एक जबरदस्त पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये सैफ अली खानच्या डोळ्यात एक बदल्याची आग झळकताना दिसत आहे. सध्या देशभर दसऱ्याचा उत्साह असतानाच रावणासारखीच १० तोंडे असलेला नागा साधू या पोस्टरमध्ये दाखवण्यात आला आहे. या १० शकलांवर वेगवेगळे भाव उमटलेले आहेत. 'लाल कप्तान' हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या खूपच जवळ येऊन ठेपलाय त्यामुळे चित्रपटकर्त्यांबरोबरच प्रेक्षकांचीही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

नवदीप सिंह दिग्दर्शित 'लाल कप्तान' चित्रपटातील सैफ अली खान च्या नागा साधूच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आधीच कौतुकाचा वर्षाव केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सेक्रेड गेम्स' मधील कामगिरीबद्दल वाहवा मिळालेला हा कलाकार आता लाल कप्तान मधील एका गंभीर भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला होता. त्याला देखील प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

आता येत्या १८ ऑक्टोबरला चित्रपट देशभर प्रदर्शित होईल. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे आता खूपच औत्सुक्याचे ठरेल. 'हर राम का अपना रावण, हर राम का अपना दशहरा' असे म्हणत दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी चित्रपटाचे हे नवीन पोस्टर आज प्रेक्षकांसमोर आणले.

@@AUTHORINFO_V1@@