
सलमान खान दबंग आणि दबंग २ चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर आता दबंग ३ मधून प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी आता तयार आहे. आज दबंग ३ चित्रपटाचे शूटिंग संपल्याची घोषणा प्रेक्षकांच्या लाडक्या चुलबुल पांडे अर्थात सलमानने सोशल मीडियावरून केली. आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
सलमान खानने आपल्या चाहत्यांसाठी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून सध्या तो खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने 'दबंग ३' चे शूटिंग संपत असतानाच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्याही त्याच्या खास बजरंगी भाईजान च्या शैलीत त्याने हा व्हिडीओ केल्यामुळे चाहत्यांना तो भावला असल्याचे दिसत आहे. शिवाय त्याने ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली आहे. #Dabangg3 pic.twitter.com/VZecKOtaYD
प्रभू देवा, सलमान खान बरोबर दुसऱ्यांदा चित्रपट करत आहे. तर दबंग ३ मध्ये पुन्हा एकदा अरबाज खान 'मक्खी' ची भूमिका साकारणार आहे. या सगळ्या गोष्टींमुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. येत्या २० डिसेम्बरला चित्रपट देशभर प्रदर्शित होईल.