५० वा इफ्फि महोत्सव गोव्यात 'या' तारखांना साजरा होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2019
Total Views |


केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतेच ५० व्या भारतात दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गोव्यात चित्रपट महोत्सव साजरा होणार असून २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान हा महोत्वसावाचे आयोजन करण्यात येणार आहे असे जावडेकर यांनी यावेळी सांगितले.

यावर्षी महोत्सवात ७६ देशातील २०० चित्रपट दाखवण्यात येणार असून त्यापैकी २६ फिचर आणि १५ नॉन फिचर चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे अशी माहिती देखील जावडेकर यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या खास चित्रपटांचे स्क्रीनिंग देखील करण्यात येईल. त्यांचे या चित्रपट क्षेत्रातील योगदान फार मोलाचे असल्याने हे चित्रपट या वेळी दाखवण्यात येणार आहेत.

त्याशिवाय उरी: द सर्जिकल स्ट्राईक, बढाई हो, गली बॉय, सुपर ३० या चित्रपटांचा महोत्सवात समावेश असेल. तसेच यावर्षीच्या महोत्सवात विविध भाषांमधील ५० वर्ष पूर्ण झालेले १२ विशेष चित्रपट दाखवण्यात येतील. विशेष म्हणजे यावर्षीच्या चित्रपट महोत्सवात दृष्टिहीन लोकांसाठी विशेष चित्रपटांचे स्क्रीनिंग देखील करण्यात येणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@