सावरकरांचे विचार प्रबळ राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी : श्रीपाद नाईक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2019
Total Views |


 


स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकास संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट

 

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथे संरक्षण राज्यमंत्री, तसेच आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार प्रबळ राष्ट्राची निर्मिती होण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

 

यावेळी स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे, राजेंद्र वराडकर, मुकुंद गोडबाले तसेच सावरकर आयुर्वेद केंद्राचे प्रमुख वैद्य नंदकुमार मुळ्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विविध उपक्रमांविषयी जाणून घेतले. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर रायफल क्लबला त्यांनी भेट देऊन नेमबाजीचा सरावदेखील केला. नंतर त्यांनी धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रालादेखील भेट दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा, ग्रंथसंपदा देऊन त्यांना स्मारकाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@