भारताचा आफ्रिकेवर २०३ धावांनी विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2019
Total Views |

 

 
 
विशाखापट्टणम : टीम इंडियाने कसोटी मालिकेत पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी दणदणीत मात केली. मालिकेत १-०, अशी विजयाची आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने ३५ धावा देत पाच गडी तर रविंद्र जडेजाने ८७ धावा देत चार बळी मिळवत भारताला एकहाती विजय मिळवून दिला.



 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी नऊ बळींची गरज होती. टीम इंडियाने सकाळपासूनच सामन्यावर आपली पकड मजबूत केली. दोन सत्रांमध्येच विजय नावावर केला, पहिल्याच सत्रात मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांच्या घातक फिरकी गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचे एक मागोमाग एक असे सात फलंदाज तंबूत धाडले. विजयासाठी दोन बळी दूर असताना भारताने दुसऱ्या सत्रात २२ षटके फेकत या सामन्यावर आपले नाव कोरले. या सामन्यात ८ बळी मिळवणारा रविचंद्रन अश्विनने सर्वात जलद बळी मिळवण्याच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी केली आहे.



 

चौथ्या दिवशी शनिवारी भारताने आपल्या दुसऱ्या डावात रोहित शर्माच्या (१२७) दमदार शतकाच्या जोरावर भारताने ३२३-४च्या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला. भारताला पहिल्या डावात ७१ धावांची आघाडी मिळाली होती. आफ्रिका संघापुढे विजयासाठी ३९५ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात आफ्रिकेने शनिवारी चौथ्या दिवसाचा खेळ संपताना ११ धावांवर आपला गडी गमावला. इथून पुढे आपला खेळ सुरू करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिका संघासाठी रविवार आपल्या बाजूने वळवण्यात यश आले नाही.



@@AUTHORINFO_V1@@