शेअर बाजारात खरंच पैसा मिळतो का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2019
Total Views |




सर्वच नवीन येणाऱ्या गुंतवणूकदाराच्या मनात एक मुख्य प्रश्न असतो तो म्हणजे शेअर बाजारात पैसा मिळेल का नाही ?

 

शेअर बाजार म्हणजे नुसता पैसा आणि पैसा असा खूप लोकांच गैरसमज असतो. काही नवीन येणारे गुंतवणूकदार तर आपले पैसे दुप्पट किंवा तिप्पट कसे होतील, यावरती जास्त लक्ष देतात. शेअर बाजारात पैसे टाकले की लगेच आपल्याला परतावा मिळणार आणि आपण लवकरच श्रीमंत होणार, गाडी-बंगला आणि सर्व काही एकदम कमी वेळात मिळणार, अशी स्वप्न बघायला सुरुवात करतात. मात्र, होत याऊलटच परतावा मिळणे सोडाच मूळ रक्कमही गमावण्याची वेळ येते. असं का होतं, याची कारणे खालील असू शकतात.

 

१) अपूर्ण ज्ञान - शेअर बाजारात काही लोक हवेत बाण मारत असतात. कधी कधी एखादा ट्रेड बरोबर येतो आणि त्यात प्रॉफिट बनतो पण इतर वेळेस नुकसान होते. ाचे मुख्य कारण म्हणजे टेक्निकल किंवा फंडामेंटल ज्ञान नसणे. शेअर बाजारात काम करत असताना आपल्याला किमान मूलभूत पातळीचे टेक्निकल किंवा फंडामेंटल ज्ञान असणे आवश्यक आहे.

 

२)संयमाचा अभाव - शेअर बाजारात काम करत असताना काही लोकांना टेक्निकल किंवा फंडामेंटल ज्ञान असते तरही नुकसान होते. याचे मुख्य कारण म्हणजे संयमाचा अभाव हे असू शकते. शेअर बाजारात संयम हा खूप महत्त्वाचा असतो. शेअर बाजारात संयम ठेवून योग्य वेळी ट्रेड करणे खूप फायद्याचे ठरते.

 

३) निर्णय घेण्याची क्षमता - शेअर बाजारात खूप पटकन निर्णय घ्यावे किंवा बदलावे लागतात. मार्केट आपल्या विरुद्ध दिशेने जात असेल, तर जेवढ्या लवकर आपण त्यातून बाहेर पडू तितके चांगले असते. परंतु, काही लोक आपल्या निर्णयावरती ठाम राहतात आणि जरी नुकसान होत असेल तरीही ट्रेंड चालू ठेवतात. मार्केटचा ट्रेंड बदलला की लगेच आपल्यलासुद्धा आपला निर्णय बदलावा लागतो आणि जे लोक लवकर आपल्या चूका मान्य करतात ती शेअर बाजारात यशस्वी होतात.

 

४) गरजेपेक्षा जास्त माहिती - काही ट्रेंड असे असतात की त्यांना मार्केटमध्ये असणाऱ्या जवळजवळ सर्व गोष्टींची माहिती असते. टेक्निकल असो वा फंडामेंटल /हार्मोनिक पॅटर्न असो किंवा इतर कोणतीही पद्धत सर्वच गोष्टीचा अभ्यास केल्यामुळे खूप वेळा लोकांचा घोळ होतो आणि नुकसानही. शेअर बाजारात काम करत असताना आपण जेवढ्या सोप्या आणि सध्या पद्धतीने काम करू तेवढे यशस्वी बनतो.

 

५) स्ट्रॅटेजी - आजकल बाजारात स्ट्रॅटेजीच्या मागे लोक धावताना दिसतात. एक अशी स्ट्रॅटेजी मिळावी की रोज आपल्याला प्रॉफिट मिळवून देईल पण कोणतीही स्ट्रॅटेजी ही १०० टक्के काम करत नाही. बाजाराचा मूड जसा असेल त्याप्रमाणे आपल्याला आपली स्ट्रॅटेजी बदलावी लागते. नवीन ट्रेंडरने स्ट्रॅटेजीच्या मागे न लागता आपल्या चुकांमधून शिकून आपल्या नवीन ट्रेंडर पद्धती बनवावी जेणेकरून आपण स्वतः निर्णय घेऊ शकतो. शेअर बाजारात पैसा हा मिळतो १०० टक्के मिळतो, पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि आयुष्यात कोणतीच गोष्ट ही मोफत किंवा कष्ट न करता मिळत नाही. शेअर बाजारात व्यापारी व्हा, जुगारी नाही.

नितिलेश पावसकर

- सेबी रजिस्टर रिसर्च अॅनलिस्ट,

तनिषा अकॅडमी (रत्नागिरी) ८६०५१६८५२५

@@AUTHORINFO_V1@@