मुख्यमंत्री फडणवीसांशी थेट संवाद साधण्याची संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2019
Total Views |
 


मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी आता नागरिकांसाठी चालून आली आहे. शहरातील बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन हॉल (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज), पहिला मजला, पी. जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई  येथे ‘वेध नव्या महाराष्ट्राचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

सोमवारी दि. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला अधिकाधिक नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि सा. ‘विवेक’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत. 

@@AUTHORINFO_V1@@