आरे कारशेड प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : आरे हे जंगल नाही, असे सांगत सर्व याचिका उच्च न्यायालयातून फेटाळल्यानंतर हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. रिशष रंजन या विधी शाखेतील विद्यार्थ्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहीत या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सोमवारी सकाळी १० वाजता सुनावणी घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

 

दरम्यान रंजन या विद्यार्थ्याच्या पत्राचे जनहित याचिकेत रुपांतरण करण्यात आले आहे. मुंबई महापालिका, मेट्रो प्राधिकरण, मुंबई पोलीस यांच्या मदतीने सुरू असलेल्या वृक्षतोडीला स्थगिती देण्यात यावी, असे पत्र न्यायाधीशांना लिहीण्यात आले होते. त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

@@AUTHORINFO_V1@@