'आपल्या प्रार्थना स्वार्थाच्या नाहीत, तर कल्याणाच्या' : सहसरकार्यवाह श्री कृष्णगोपालजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2019
Total Views |


   

नवी दिल्ली : “वेद आणि श्रुतीतील आदर्श जेव्हा विसरले जातात तेव्हा धर्मग्लानी येते. वेद वाङ्मयात स्त्रियांना अत्यंत सन्मानाचे स्थान आहे. काही वेदॠचांच्या कर्त्या स्त्रिया आहेत. आपल्या श्रुती वाङ्मयात जातिभेद, अस्पृश्यता यांना स्थान नाही. आपल्या प्रार्थनादेखील स्वार्थाच्या नाहीत, तर सर्वांच्या कल्याणाच्या असतात,” असे उद्गार रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह श्री कृष्णगोपालजी यांनी दिल्ली येथे काढले.



संकल्प ही पूर्व नागरी सेवा अधिकार्‍यांची संस्था आहे. ही संस्था नागरीसेवेत जाऊ इच्छिणार्‍या समाजातील तळागाळातील बुद्धिमान मुलांचे प्रशिक्षण करीत असते. दिल्लीस्थित या संस्थेचे कार्य सर्व देशभर आहे आणि या संस्थेशी निवृत्त सेनाधिकारी, निवृत्त न्यायमूर्ती, निवृत्त आयपीएस अधिकारी फार मोठ्या संख्येने जोडले गेले आहेत. दिल्ली येथील दोन दिवसीय व्याख्यानमालेत याच वर्गाची उपस्थिती होती. व्याख्यानमालेचे स्वरूप विषय मांडणी आणि त्यावर प्रश्नोत्तरे असे होते. कृष्णगोपालजी यांना काही प्रश्न विचारले गेले. एका श्रोत्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संघावर केलेल्या टिकेबाबत होता. कृष्णगोपालजींनी त्याला उत्तर देताना म्हटले की, “संघ केवळ भारतापुरता मर्यादित आहे. इमरान खान यांनी संघाविषयी असेच बोलत जावे, त्यामुळे जगाला संघ माहीत होईल.”



व्याख्यानमालेतील दुसरे व्याख्यान रमेश पतंगे यांचे होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संवैधानिक ज्ञान किती खोलवरचे होते हा विषय राज्यघटनेच्या उद्देशिकेपासून ते विविध कलमांपर्यंत कसा व्यक्त झाला आहे याचे अनेक दाखले आणि आंबेडकरांच्या भाषणातील काही उतारे वाचून सांगितले. अशाप्रकारची मांडणी श्रोत्यांना नवीन होती. राज्यघटनेविषयी कायदेशीर भाषेत वक्ते बोलतात. पतंगे यांनी तो मार्ग टाळून सामान्य भाषेत घटनेचा मूलभूत आशय समजून सांगण्याचा प्रयत्न केला.



पतंगे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात पंडित नेहरू यांच्या घटना समिती निर्मितीच्या योगदानाच्या विषयाने केली. घटना समितीच्या निर्मितीचे श्रेय त्यांना द्यावे लागते, हे त्यांनी सांगितले. या विषयाची बातमी नंतर एका इंग्रजी वृत्तसंस्खेने केली. संघाच्या एका ज्येष्ठ व्यक्तीने पंडित जवाहरलाल नेहरू यांची स्तुती केली, असे प्रथमच घडले, असे त्यांनी आपल्या बातमीत म्हटले. कैलाश कपूर हे शिमला येथील उच्च शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. संस्कृत भाषा आणि हिंदू धर्मशास्त्र याचे ते गाढे अभ्यासक आहेत. आपल्यालाच आपल्या धर्मशास्त्राची त्यातील खोलवरच्या आशयाची काहीही माहिती नसते. ती पाश्चात्त्य विद्वानांकडून आपल्याला घ्यावी लागते, असे सांगून त्यांनी आपले प्राचीन चिंतन काय होते हे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला.



दहशतवाद्यांची गय केली जाणार नाही


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनेचे
३७० कलम’ रद्द करण्यामागची भूमिका स्पष्ट आणि परखड शब्दांत मांडली. मानवाधिकाराच्या नावाखाली गळा काढणार्‍यांना त्यांनी प्रश्न विचारले की, आतापर्यंत ४१ हजार लोकं काश्मिरी दहशतवादात ठार झाले, काश्मिरी पंडितांना आपली घरे-दारे सोडून देशाच्या अन्य भागांमध्ये जावे लागले. यांच्या मानवाधिकारांबद्दल तुम्ही कधी अश्रू ढाळले आहेत का? ‘३७०’ रद्द करून दोन महिने झाले. तेथे एकही गोळी झाडली गेलेली नाही. दहशतवादी मारले गेले आणि ते मारले जातील. त्यांची गय केली जाणार नाही. पंडित नेहरू यांनी काश्मीरचा विषय आम सभेत नेऊन घोडचूक केली हेदेखील सांगायला ते विसरले नाहीत.

@@AUTHORINFO_V1@@