अनंतनाग येथे दहशतवादी हल्ला ,१० गंभीर जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2019
Total Views |




नवी दिल्ली 
: जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामुळे १० जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात जखमी झालेले सर्व लोक स्थानिक नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी सर्व जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जखमींमध्ये स्थानिक पत्रकार आणि पोलिस कर्मचारीही आहेत. घटनेची माहिती मिळताच सैन्याने या भागाला घेराव घालून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.

@@AUTHORINFO_V1@@