संघ मानहानी प्रकरण, राहुल गांधींचा वेळकाढूपणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2019
Total Views |



मुंबई : २०१७ साली गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर राहुल गांधी आणि सीताराम येचुरी यांनी एक बेजबाबदार वक्तव्य केले होते. गौरी लंकेश यांची हत्या रा.स्व.संघाने केली, असा आरोप त्यांनी केला होता. त्याविरोधात वकील धृतिमान जोशी यांनी माझगाव, शिवडी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता.

 

त्या खटल्यात दि. ४ जुलै २०१९ रोजी राहुल गांधी व सीताराम येचुरी यांना न्यायालयाची वारी घडली होती. धृतिमान जोशी यांनी दाखल केलेली तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज राहुल गांधींनी २१ सप्टेंबर २०१९ रोजी दाखल केला होता. त्या अर्जावर युक्तिवाद करण्यास राहुल गांधीचे वकील यांनी न्यायालयाकडे वेळ मागून घेतला होता. त्यानंतर शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी राहुल गांधींच्या वकिलांनी युक्तिवादासाठी आणखीन वेळ मागून घेतला आहे. त्यावर सुनावणी १८ ऑक्टोबर २०१९ रोजी माझगाव न्यालालयात होणार आहे.

 

दरम्यान, राहुल गांधींनी न्यायालयातील उपस्थित राहण्याची सक्ती करू नये, यासाठी देखील अर्ज दाखल केला होता. त्यावर शनिवारी युक्तिवाद करण्यात आला. वकील धृतिमान जोशी यांनी राहुल गांधींच्या मागणीला विरोध दर्शविला आहे. राहुल गांधी आर्थिक, आरोग्य अशा कोणत्याही आधारावर न्यायालयात उपस्थित राहण्यापासून वगळण्याची मुभा दिली जाऊ शकत नाही, असे धृतिमान जोशी म्हणाले. मी खासदार असल्यामुळे मला उपस्थित राहण्याची सक्ती करू नये, असा युक्तिवाद राहुल गांधींच्या वतीने करण्यात आला. राहुल गांधींनी दाखल केलेल्या दोन्ही अर्जावरील सुनावणी १८ ऑक्टोबर २०१९ रोजी होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@