खाद्यपदार्थांच्या पाकीटांवर असणार 'हा' लोगो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2019
Total Views |


अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचा
ट्रान्स-फॅट फ्रीलोगो लॉन्च


नवी दिल्ली
: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज आठव्या आंतरराष्ट्रीय शेफपरिषद (आयसीसी सातवा) येथे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएएआय)चा ट्रान्स फॅट फ्रीलोगो लॉन्च केला. यामुळे ट्रान्स-फॅट्सविरूद्धच्या चळवळीतील महत्त्वाचा टप्पा पार झाला. एफएसएसएएआयच्या ईट राइट इंडियाचळवळीला गती देण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे.

कार्यक्रमात डॉ.हर्षवर्धन यांनी असे म्हटले आहे की
, “एफएसएसएआयची ईट राईट इंडियाचळवळ २०२२ पर्यंत या न्यू इंडिया’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला पूरक आहे.’’ यात आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि पोषण यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी मन की बातसंबोधनात इट राईट मूव्हमेंटविषयीचा उल्लेख केल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले.


डॉ हर्ष वर्धन पुढे म्हणाले की
, “ही आपल्या सर्वांसाठी आणि विशेषत: शेफसाठी राष्ट्रीय आणि सामाजिक जबाबदारी आहे. कारण त्यांनी दिलेला आहार केवळ सुरक्षित आणि चवदारच नाही तर आरोग्यदायी देखील आहे याची खातरजमा करण्याची अतिरिक्त जबाबदारीही घेतली आहे. एफएसएसएएआय यांनी विविध भागधारकांना एकत्रितपणे काम करण्यासाठी आणि ईट राईट इंडियाचळवळ पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे अभिनंदन केले.



या कार्यक्रमात डॉ हर्ष वर्धन यांनी
'शेफ्स फोर ट्रान्स फॅट फ्री' हा नारा दिला , ज्या अंतर्गत देशाच्या विविध भागांतील एक हजाराहून अधिक शेफनी त्यांच्या पाककृतींमध्ये ट्रान्स-फॅट फ्री तेल वापरण्याचा संकल्प केला आणि त्याच्यापासून दूर राहण्याच्या दृष्टीने कार्य केले. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी शेफसाठी ट्रान्स-फॅट फ्री ब्रोशर, ट्रान्स-फॅट फ्री जाहीरनामा, तसेच ट्रान्स-फॅट फ्री रेसिपी स्वीकारल्याबद्दल पाच शेफना विशिष्ट पिनचे वाटप केले. तसेच त्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये ट्रान्स-फॅट फ्री तेल वापरणार्‍या दहा बेकरी आणि भविष्यात ट्रान्स-फॅट फ्री तेल वापरण्यास वचनबद्ध असणाऱ्या बेकरींचाहि सत्कार केला.

@@AUTHORINFO_V1@@