कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारत १ बाद १७१ धावांवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2019
Total Views |


विशाखापट्टणम येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात आज भारताने १ बाद १७१ धावा केल्या आहेत. सलामीवीर मयांक अग्रवाल सात धावाकाढून बाद झाला आहे. दरम्यान भारताने पहिल्या डावात ७१ धावांची आघाडी घेत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ४३१ धावांवर रोखून धरला. यामध्ये महत्वाचे योगदान देत भारताच्या आर. अश्विनने दक्षिण आफ्रिकेचे सात गाडी बाद केले.

सध्या भारतीय संघकामधील फलंदाज रोहित शर्माने अर्धशतक झळकावत ११८ बॉल्समध्ये ८४ धावा केल्या आहेत. तर चेतेश्वर पुजाराने देखील अर्धशतक करत १३३ बॉल्समध्ये ७५ धावा केली आहेत.

पहिल्या कसोटी मालिकेतील पहिल्या डावात भारताने आघाडी घेतल्यामुळे भारताचे ही मालिका जिंकण्याची शक्यता वाढली आहे. मात्र आगामी सामन्यांमध्ये भारताची कामगिरी कशी राहते याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@