काश्मीर खोऱ्यात सैन्य भरतीचा जोश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2019
Total Views |

 


श्रीनगर : भारतीय सैन्याच्यावतीने श्रीनगरमध्ये तीन व चार ऑक्टोबर रोजी सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले. याठिकाणी श्रीनगर व आसपासच्या जिल्ह्यातील तरुण मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहेत. सेना भर्ती कार्यालय (एआरओ) जम्मू, एआरओ श्रीनगर आणि जेकेएलआय रेजिमेंटल सेंटर व राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सैन्य भरती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील तरुणांच्या विकासासाठी केंद्र सरकार सतत संधी उपलब्ध करून देत ​​आहे. जम्मू-काश्मीरमधील विकासाच्या क्षेत्रात आणि तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकारची विविध मंत्रालये प्रयत्नशील आहेत.

 

 




खोऱ्यातील तरुणाई विकासाच्या मार्गावर

जम्मू-काश्मीरमधील तरुणांना सरकारकडून सतत नोकरीच्या संधी मिळत आहेत. सरकारच्या या संधीचा फायदा तरूणही घेत आहेत आणि सर्व सरकारी भरतीत भाग घेत आहेत. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ३ महिन्यांत ५० हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा देखील केली आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमधील तरुणांना सतत नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.



 

@@AUTHORINFO_V1@@