कॉंग्रेस सोडणार ? संजय निरुपम यांचे भाकीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2019
Total Views |




मुंबई : कॉंग्रेस पक्षात कोणतेही व्यवस्थापन राहीले नसल्याचे सांगत कॉंग्रेसला लवकरच राम राम करणार असल्याचे सुतोवाच संजय निरुपम यांनी केले आहे. केवळ माझ्याच नव्हे, राहुल गांधी यांच्या विरोधातही कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी कॉंग्रेसवर केला. हे सर्व सुरळीत न झाल्यास कॉंग्रेस पक्ष बुडेल, असा इशारा संजय निरुपम यांनी दिला.

 

महाराष्ट्र विधानसभा उमेदवार यादी जाहीर झाल्यापासून मुंबई काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर आली. एकाही समर्थकाला तिकीट न मिळाल्याने निरुपम यांनी बंडाचा झेंडा उगारला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षनेतृत्वावर थेट हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.

 

निरुपम यांनी सुचवलेल्या उमेदवाराचे नाव यादीत न दिल्याने ते संतापले आहेत. मुस्लिम मतदार काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करतात. त्यामुळे मुंबईत मुस्लिमांना द्यावी, अशी सूचना त्यांनी दिली होती. मात्र, खर्गेंनी याकडे काणाडोळा केल्याचे ते म्हणाले. पक्ष सोडण्याबद्दल अद्याप कुठली भूमिका घेतली नसली तरीही लवकरच तसा निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@