बालाकोट हवाई हल्ल्याची शौर्यगाथा सांगणारा पहिला व्हिडिओ प्रसिद्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2019
Total Views |



नवी दिल्ली
: भारतीय वायुसेनेने बालाकोट हवाई हल्ल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे
, ज्यामध्ये भारताने बॉम्बस्फोट करून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केल्याचे दिसत आहे. पुलवामा येथील सीआरपीएफच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनांचे तळ नष्ट केले. शुक्रवारी भारतीय वायुसेनेचे नवे वायुसेना प्रमुख राकेशकुमारसिंग भदोरिया यांनी पत्रकार परिषदेत बालाकोट एअरस्ट्राईकचा प्रोमोशनल व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये बालाकोट एअरस्ट्राइकची दृश्ये आहेत.




@@AUTHORINFO_V1@@