युवराजांचे 'आरे' धोरण पडले नगरसेवकाला महागात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2019
Total Views |


मुंबई (प्रतिनिधी) - बहुचर्चित आरे प्रकरणावर शुक्रवारी निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या. मात्र, याचा जबर फटका शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांना बसला आहे. जाधव यांनी 'मेट्रो-३'च्या कारशेडसाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका बरखास्त करताना न्यायालयाने त्यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे 'आरे' धोरण नगरसेवकाला चांगलेच महागात पडले आहे.

 
 

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत शिवसेना नगरसेवकांनी आरे वसाहतील 'मेट्रो-३' च्या कारशेडसाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांबाबत विरोध दर्शविला होता. यावेळी नगरसेवक यशवंत जाधव यांनी झाडे तोडण्याविरोधात मत दिले होते. शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध करूनही वृक्षतोडीचा प्रस्ताव मान्य झाला होता. त्यामुळे शिवसेना नगरसेवक चांगलेच संतापले होते. त्यात शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही कारशेडला विरोध दर्शविल्याने वातावरण चांगलेच तापले. अशा तापलेल्या वातावरणात नगरसेवक यशवंत जाधव यांनी न्यायालयात वृक्षतोडीला विरोध दर्शवणारी याचिका क्रमांक 2410/2019 दाखल केली.

 

मात्र, याचिकेवरील सुनावणीदरम्यान जाधव यांनी चक्क भूमिकेविरोधी युक्तीवाद केला. मी नेमकं कोणत्या बाजूने मतदान करत होतो हे मला कळलं नाही, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयासमोर केला होता. त्यावर न्यायालयाने जाधवांवर ताशेरे ओढले होते. अशा प्रकारची खोटारडी प्रतिज्ञापत्र दाखल केल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी तंबी मुख्य न्यायाधीशांनी त्यांना दिली होती. न्यायालयाने शुक्रवारी आरेसंदर्भातील सर्व याचिका निकालात काढल्या. त्यावेळी न्यायालयाने जाधव यांना ५० हजार रुपयांचा ठोठावला. जाधव यांच्या पत्नी भायखळा विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत.


@@AUTHORINFO_V1@@