'शकुंतला देवी' मधील नवीन पोस्टर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2019
Total Views |


मानवी संगणक म्हणून ओळख असलेल्या शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिका साकारत असून नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार दंगल गर्ल सानिया मल्होत्रा आता या चित्रपटाचा एका हिस्सा बनण्यास सज्ज झाली आहे. तिच्या भूमिकेचे नवीन पोस्टर आज प्रदर्शित झाले.

सानिया या चित्रपटात शकुंतला देवी यांच्या मुलीची म्हणजेच अनुपम बॅनर्जीची भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमध्ये ती एका पुस्तकाच्या आडून बघत आहे. पण तिने प्रेक्षकांना उद्देशून आपल्या पोस्टमध्ये मेसेज दिला आहे की पुस्तकाच्या कव्हरवरून तुम्ही अनुमान लावू नका. त्यापलीकडे खूप काही तुम्हाला या भूमिकेमधून सापडेल. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान या आधी सानियाने चित्रपटाच्या संहिता वाचनाच्या वेळचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते जे खूप व्हायरल झाले.

@@AUTHORINFO_V1@@