मणिरत्नम आणि अनुराग काश्यपसह ५० लोकांविरुद्ध एफआयआर दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Oct-2019
Total Views |

 


 

 

मणिरत्नम, अनुराग कश्यप, अपर्णा सेन यांच्यासह ५० प्रसिद्धीप्राप्त व्यक्तींवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मॉब लिंचिंग प्रकरणी या लोकांनी पंतप्रधानांना उद्देशून काही महिन्यांपूर्वी ओपन लेटर लिहिले होते. या लेटरमध्ये मुस्लिम, दलित आणि अल्पसंख्याकांच्या होणाऱ्या मॉब लिंचिंगविरुद्ध हे पात्र लिहिले असल्याचे नमूद करण्यात आले होते. 

 

 

स्थानिक वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी आदेश मंजूर केल्यानंतर आता या सर्व सिलेब्रिटीजवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुधीर कुमार ओझा नावाच्या वकिलांनी या सेलिब्रिटींविरोधात याचिका दाखल केली होती. पंतप्रधानांना उद्देशून असे ओपन लेटर लिहिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यायाने देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या सिने कलाकारांनी केला आहे असे याचिकाकर्त्यांनी नमूद केले आहे. 

 

२० ऑगस्टला दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर आज सरदार पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ओपन लेटर लिहिलेल्या लोकांनी मॉब लिंचिंगच्या ८४० प्रकरणांचा उल्लेख केला असून 'जय श्री राम' ही घोषणा 'वॉर क्राय' असल्याचे देखील म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@