सेनेच्या होर्डिंग वर फक्त शाहांचा फोटो

    04-Oct-2019
Total Views | 269

 




हे पोस्टर ठरलंय चर्चेचा विषय 

मुंबई (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षासह, शिवसेना युतीत असले तरी त्यांच्यात यापूर्वी झालेली धूसफूस जनता विसरलेली नाही. 

निवडणुकीच्या रणधुमाळीत, मात्र मुंबईत झळकलेल्या या शिवसेना होर्डिंगने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
मागील विधानसभा निवडणुकींच्या वेळेत अमित शाहांचा उल्लेख अत्यंत अपमानजनक शब्दात शिवसेनेने केला होता. आज मात्र विरार येथून सेनेच्या तिकिटावर विधानसभा लढत असलेले प्रदीप शर्मा यांनी हे होर्डिंग प्रचारासाठी लावले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, संपूर्ण होर्डिंग वर कुठेही उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंचा फोटो नाही. सेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याचादेखील फोटो नाही. 



 

शिवसेनेच्या पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो तरी असतो. पण या होर्डिंगमधून बाळासाहेबांनाही वगळण्यात आले आहे. अमित शाह हेच शिवसेनेचा चेहरा असल्याचा भास होर्डिंग कडे पाहिल्यावर होतो.

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121