
नवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग साईट अशी ओळख असणाऱ्या ट्विटरने राजकीय जाहिरातींवर पूर्णतः बंदी आणली आहे. संपूर्ण जगभरातील ट्विटर वापरकर्त्यांना आता ट्विटरवर राजकीय जाहिराती प्रसारित करता येणार नाहीत. त्याचबरोबर ट्विटरचे हे नवीन धोरण २२ नोव्हेंबरपासून अंमलात येईल. कंपनीचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत अधिक माहिती दिली. याबरोबरच डॉर्सी यांनी ट्विटरने जाहिरातीवर बंदी घालण्यामागची अनेक कारणे देखील स्पष्ट केली.
मतदार नोंदणी व जनजागृतीच्या उपक्रमांवर बंदी नाही
१५ नोव्हेंबरला ट्विटर आपले नवीन धोरण सादर करेल. लोक मतदार नोंदणीसाठी जाहिराती देऊ शकतील. यासह,काही अपवाद वगळता ट्विटर २२ नोव्हेंबर रोजी नवीन नियम देखील अंमलात आणेल, जेणेकरून जाहिरातदारांना नवीन सूचना कालावधी मिळेल. त्याच वेळी जॅकने म्हटले आहे की," इथे अभिव्यक्तीची गोष्ट नाही. येथे पैसे देऊन, राजकीय भाष्य केल्याने लोकांवर त्याचा प्रभाव दिसू लागतो.
We’ve made the decision to stop all political advertising on Twitter globally. We believe political message reach should be earned, not bought. Why? A few reasons…🧵
— jack (@jack) October 30, 2019
भारत सध्या राजकीय जाहिराती हाताळण्याच्या मुद्द्यावर अनेक उपायोजना शोधत आहे . यापूर्वीही भारत सरकारने या जाहिरातींबाबत नियम लागू करण्यास सांगितले होते.ट्विटरवरील राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी जॅकला जगभरातून भरपूर पाठिंबा मिळाला आहे.