शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी दिवाळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2019
Total Views |




मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने गुरुवारी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे. दुपारी १ वाजता निर्देशांक ४० हजार ३४४.९९ अंशांवर पोहोचला. सेन्सेक्स २२७.९६ अंशांच्या उसळीसह कामगिरी करत आहे. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७२.७० अंशांच्या तेजीसह ११ हजार ९१६.८० इतक्या स्तरावर कामगिरी करत होता.

 

सलग पाचव्या सत्रात सेन्सेक्सने नवा उच्चांक गाठला आहे. यापूर्वी चार सत्रात सेन्सेक्स एकूण १ हजार ३१.४८ अंशांनी वधारला होता. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक इन्फोसिसने ५.०२ टक्के तर एसबीआय ४.८८ टक्के, अ क्षेणीतील शेअरमध्ये डिश टीव्ही सर्वाधिक १७ टक्के तर सेंट्रल बॅंक १२ टक्क्यांनी वधारले.

 

कर सुधारणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण

लॉंग टर्म कॅपिटल गेन (एलटीसीजी), सिक्युरीटी ट्रान्झेक्शन टॅक्स आदी करांमध्ये केंद्र सरकारकडून सवलत जाहीर झाल्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण आहे. तिमाही निकाल, ब्रेग्झिटसाठी वाढवून मिळालेली वेळ, अमेरिका-चीन व्यापार युद्धाबद्दल बैठक, भारतातील सणासुदीच्या दिवासांमुळे वाहन उद्योगातील विक्री याचा एकात्मिक सकारात्मक परिणाम बाजारावर झाला आहे.

@@AUTHORINFO_V1@@