काश्मीरप्रश्नी ड्रॅगनला सुनावले : आमच्या अंतर्गत बाबीत लक्ष देऊ नका !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2019
Total Views |



नवी दिल्ली : जम्मू काश्मीरप्रश्नी टीपण्णी करणाऱ्या चीनला भारताने खडेबोल सुनावले आहेत. चीनने आमच्या अंतर्गत बाबींवर लक्ष घालू नये, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, "जम्मू काश्मीर आणि लडाख हे भारताचा अविभाज्य भाग आहेत. ज्या प्रमाणे भारत इतर देशांच्या अंतर्गत बाबींवर टीपण्णी करत नाही त्याच प्रमाणे इतर देशांनीही त्याबद्दल बोलणे टाळावे. आमच्या सार्वभौमत्वाबद्दल आणि क्षेत्रीय अखंडतेबद्दल इतर राष्ट्र सन्मान करतील, अशी आशा बाळगतो."

 

'चीनने लडाखमध्ये एका मोठ्या भूभागावर कब्जा केला आहे. १९६३मध्ये झालेल्या तथाकथित चीन-पाकिस्तानने तथाकथित १९६३ करारानंतर या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे.' या गोष्टीकडेही रविश कुमार यांनी लक्ष केंद्रीत केले. पाकिस्तान आणि चीन कलम ३७० हटवल्यानंतर वारंवार याबद्दल वक्तव्य करत आहेत. भारताने हा आमचा अंतर्गत मुद्दा असल्याचे वेळोवेळी ठणकाऊनही दोन्ही देशांनी याबद्दल भारताला डीवचण्याचा प्रयत्न केला आहे.

 

म्हणे केंद्रशासित प्रदेश बेकायदेशीर

जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश जाहीर झाल्यानंतर चीनने या प्रकरणी प्रतिक्रीया दिली आहे. अशाप्रकारे राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करणे बेकायदेशीर आहे. दरम्यान, याच वक्तव्याचा समाचार भारताकडून घेण्यात आला आहे.





@@AUTHORINFO_V1@@