प्रियांका गांधींकडून सरदार पटेलांना अभिवादन नाहीच ! मात्र, भाजपवर टीका सुरूच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी वादग्रस्त ट्विट केले आहे. आपल्या ट्विटद्वारे सरकार पटेल हे कॉंग्रेस नेते कसे होते, हे सांगण्यास विसरल्या नाहीत. मात्र, या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त साधे अभिवादन करण्यासही त्या विसरल्या. याऊलट पंतप्रधानांसह भाजपच्या नेत्यांनी वल्लभभाई पटेल यांचे स्मरण केल्याबद्दल टीका केली आहे.

 

कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी ट्विटरवर बऱ्याच सक्रीय असतात. बऱ्याच राजकीय घटनांसह अन्य घटनांवरही त्या व्यक्त होत असतात. ३१ ऑक्टोबर रोजी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी वल्लभभाई पटेल हे कॉंग्रेस नेते होते आणि त्यांचे नेहरूंशी अत्यंत जवळचे संबंध होते, असे म्हटले. रा.स्व.संघाच्या विरोधात पटेल होते, असा दावाही गांधी यांनी यावेळी केला.



 

 

स्वांतंत्र्य युद्धातील नेत्यांना त्यांनी कॉंग्रेसच्या कक्षेत उभे करत भाजपला त्यांचा महापुरुष नाही, असे म्हटले. सरदार पटेलांसारख्या महापुरुषाला एक दिवस त्यांच्या शत्रूंनाही नमन करावे लागते, असा उल्लेखही त्यांनी केला. माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेलांचा एक फोटो ट्विट करत त्याला या ओळींची कॅप्शन दिली आहे. मात्र, यावेळी आपल्या ट्विटमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनमित्त अभिवादन करण्यासाठी दोन शब्दही लिहावेसे न वाटल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली.



अग्रलेख - तुमच्याकडून राष्ट्रवादाचे धडे नको!




@@AUTHORINFO_V1@@