धक्कादायक ! आरबीआयने इतक्या बॅंकांना ठोठावला दंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2019
Total Views |




नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बंधन बॅंकेवर एक कोटींचा दंड ठोठावला आहे. प्रवर्तकांचा हिस्सा ४० टक्क्यांवर न आणल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. बॅंकींग व्यवहार सुरू केल्यानंतर तीन वर्षांत हा हिस्सा ४० टक्क्यांवर आणणे गरजेचे होते. २०१४ मध्ये बॅंकेला परवाना मिळाला होता. २०१५नंतर बॅंकेने संपूर्ण व्यवहार सुरू करण्यास सुरुवात केली.

 

जनता सहकारी बॅंकेला दंड

पुण्यातील जनता सहकारी बॅंकेवरही एक कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. नियमावलींच्या उल्लंघन प्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.

 

पीपल्स को-ऑपरेटीव्ह बॅंकांवर दंड

आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी जळगाव पीपल्स को-ऑपरेटीव्ह बॅंक लिमिटेडवर २५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

 

तमिलनाड मर्कंटाईल बॅंकेवर ३५ लाखांचा दंड

आरबीआयने यापूर्वी तामिलनाड मर्कंटाईल बॅंकेवरही दंड ठोठावला आहे. बॅंकेकडून फ्रॉड क्लासिफीकेशन आणि नोटीफिकेशन नियमावलीचे उल्लंघन झाल्याबद्दल ३५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या संबंधात २४ ऑक्टोबर रोजी निर्देश आरबीआयने जारी केले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@