चार दिवसात फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2019
Total Views |




मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे. विधिमंडळ नेतेपदाची निवड करण्यासाठी आज भाजपने सर्व नवनिर्वाचित आमदारांसह बैठक बोलावली होती. या बैठकीत एकमताने देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या सर्व आमदार व नेत्यांचे आभार मानले. तसेच पुढील पाच वर्षे युतीचेच सरकार स्थापन होईल, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.




यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला ११ आमदारांनी अनुमोदन दिले. या प्रस्तावाला भाजपाचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्र सिंह तोमर
, सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे, गणेश नाईक, संजय कुटे, देवयानी फरांदे, देवराव भोईर, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले यांनी अनुमोदन दिले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दोन वेळेस केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आले. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो.” तसेच सर्व मित्रपक्ष , भाजपचे सर्व नेते व नवनिर्वाचित आमदारांचेही आभार मानले.

 

@@AUTHORINFO_V1@@