आता भगवा फडकवणारच ! : मनसेचा 'वाघ' शिवसेनेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2019
Total Views |


मनसेला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंची खेळी


मुंबई : 'जय महाराष्ट्र, 'मी महाराष्ट्र सैनिक', अशी सुरुवात करत खळ्ळ खट्याक करणारे, मनसेचा वाघ अशी सोशल मीडियावर ओळख असणारे निष्ठावंत मनसैनिक नितीन नांदगावकर यांनी अखेर मनसेला 'जय महाराष्ट्र' केला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे मनसेतून आता संमिश्र प्रतिक्रीया उमटत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांची ही खेळी मनसेला पुरती हादरवून सोडणारी आहे.

 

राज ठाकरेंनी नांदगावकरांना दूर ठेवले ?

मराठी माणसांच्या हक्कासाठी मनसे स्टाईलने लढणाऱ्या नितीन नांदगावकर यांचा सोशल मीडियावर एक मोठा चाहता वर्ग आहे. नांदगावकर यांच्याकडे मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस पद होते. त्यांच्या समर्थनार्थ अनेक फेसबूक ग्रुप आणि पेजेस् चालवली जातात. मात्र, जेव्हा वेळ आली त्यावेळी त्यांच्या कामाची दखल न घेतल्याची भावना नांदगावकर यांच्यामध्ये आहे. राज ठाकरे यांच्या भाषणावेळीही नांदगावकर कधी मंचावर दिसले नाहीत. नांदगावकर यांना त्यांचा दरबार बंद करायचा आदेश आल्याने नांदगावकर यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.




 

शिवसेनेतून तिकीट मिळणार ?

नितीन नांदगावकर यांना शिवसेनेतून तिकीट मिळण्याची शक्यता जरी व्यक्त केली जात असली तरीही नांदगावकर यांना कोणता मतदार संघ देणार याबद्दल साशंकता आहे. आधीच बंडाळी थोपण्यात व्यस्त असलेले शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आता नांदगावकरांसाठी कोणता मतदारसंघ देणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

 

नांदगावकर यांच्यावर असू शकते ही जबाबदारी

नितीन नांदगावकर यांच्यामागे उभा असलेला त्यांचा चाहता वर्ग पाहता त्यांना विधानसभेत प्रचारासाठी मुंबई ठाण्यात प्रचाराची जबाबदारी दिली जाऊ शकते. शिवसेना प्रवेशावेळी दिलेल्या प्रतिक्रीयेत त्यांनी आपले काम त्याच जोमाने सुरू ठेवणार असल्याचे सुतोवाच केले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पुढील काम करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@