इम्रान खान सरकार धोक्यात , लष्करी ताबा घेण्याची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2019
Total Views |





इस्लामाबाद
: इम्रान खान सरकार पाकिस्तानची बुडणारी अर्थव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरले आहे. हे लक्षात घेता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी थेट स्वत: च देशाची अर्थव्यवस्था आपल्या हातात घेतली आहे. बुधवारी रात्री पाकिस्तानमधील २० मोठ्या व्यापाऱ्यांनी लष्करप्रमुख बाजवा यांची भेट घेतली आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था लवकरात लवकर वाचविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची विनंती केली.



पाकिस्तानच्या वृत्तपत्र
'द न्यूज'ने वृत्त दिले आहे की, व्यावसायिकाच्या एका गटाने इम्रान खान सरकारकडे थेट तक्रार केली आणि म्हटले की इम्रान खान हे फक्त विधान करण्याशिवाय अन्य काही ठोस पावले उचलण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे लवकरच लष्कराने थेट हस्तक्षेप करून पाकिस्तानच्या बुडत्या कंपन्यांना वाचवण्यासाठी मदत करावी आणि आवश्यक असे आर्थिक निर्णय घ्यावेत.


या व्यावसायिक गटाने असेही म्हटले की
,"त्याचा आपल्याला सध्याच्या सरकारवर विश्वास नाही, म्हणून सैन्य अधिकार्‍यांची एक समिती स्थापन करुन त्यांना आर्थिक धोरण आखण्याची व देखभाल करण्याचे काम देण्यात यावे. सरळ शब्दांत सांगायचे तर, सैन्याने व्यापारी क्षेत्र ताब्यात घेण्याचा थेट इशारा केला आहे. यावर सेनाप्रमुख बाजवा यांनी उद्योजक गटाला दिलासा देताना सांगितले की," परिस्थिती सुधारण्यासाठी लवकरच कठोर पावले उचलली जातील." गटात जुबैर तुफैल, आरिफ हबीब, मियां मनशा, हुसेन दाऊद, अली मोहम्मद तब्बा, अली जमील, जावेद चिनॉय, जुबैर मोतीवाला, एजाज गौहर, सिराज कासिम तेली आणि अकील ढेडी हे व्यावसायिक होते.

@@AUTHORINFO_V1@@