अर्बन नक्षल गौतम नवलाखा सुनावणीतून आणखीन एका न्यायमूर्तींची माघार, काय असावीत कारणे ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2019
Total Views |



 

नवलखा प्रकरणावर सुनावणी घेण्यास नकार देणारे सर्वोच्च न्यायालयातील 'न्या. रवींद्र भट' हे पाचवे न्यायाधीश ठरले 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरेगाव भीमा प्रकरणात अनेक नक्षलवादी कारवायांशी संबंधित लोकांची नावे पुढे आली होती. भारतात दंगली घडवून हिंसाचार माजविण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानुषंगाने गेल्या वर्षी २०१८ मध्ये काही प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वांची रवानगी नजरकैदेत करण्यात आली होती. सुधा भारद्वाज , व्हर्नान गोन्साल्वीस , अरुण परेरा , गौतम नवलखा व सुरेंद्र गडलिंग अशी त्यांची नावे आहेत. हि सर्वच नावे अनेकांना माहित नसली, नक्षल्यांसाठी विदेशातून पैसे वळविणे, भारतातील सरकारवर दबाव तयार करणे अशी कामे करण्यात हि माणसे आघाडीवर होती, असा आरोप आहे. प्रसारमाध्यमांची दिशाभूल करणे, नक्षलप्रभावित भागात पैसे पोहचविणे, संविधानिक संस्थाचा गैरवापर करणे , अशी कामे शहरी नक्षल समर्थक करीत असतात. 


गौतम नवलखा यांनी त्याविरुध्द पुणे पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द व्हावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे म्हंटले होते. उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द् करण्यास नकार दिल्यानंतर नवलखा सर्वोच्च न्यायालयात अपील करत आहेत. उद्या दि. ४ ऑक्टोबर रोजी नवलखा यांना अटकेपासून देण्यात आलेले सरंक्षण संपुष्टात येईल. त्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. पण सर्वोच्च न्यायालयाने यावर उद्या, म्हणजेच गुरवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे.

गौतम नवलखा यांच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पण ही सुनावणी प्रत्यक्षात सुरु होण्यापूर्वीच चर्चेत राहण्याचे मुख्य कारण आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी या सुनावाणीपासून स्वतःला वेगळे करण्याचा घेतलेला निर्णय.


न्यायमूर्ती सुनावणीपासून स्वतःला वेगळे करू शकतात का ?

न्यायमूर्तींना एखाद्या प्रकरणावर सुनावणी घेण्यापासून नकार दर्शवू शकतात. न्यायप्रक्रियेतील पारदर्शितेच्या दृष्टीने अशी सुविधा आहे.

काय असु शकतील कारणे ?

१. न्यायाधीशांचे कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नातेसंबंध खटल्यात गुंतलेले असतील तर असा निर्णय घेतला जाऊ शकतो.

२. अन्य कोणत्याही वैयक्तिक कारणास्तव न्यायमूर्तींना त्यावर सुनावणी घ्यायची नसल्यास असे केले जाऊ शकते .

अशाप्रकारे न्यायमूर्तींनी स्वतःला वेगळे केल्यानंतर इतर न्यायमूर्ती त्या खटल्यावर सुनावणी घेऊन निर्णय करतात.

३.याबाबत कोणतेही नियम किंवा कायदा अस्तित्वात नसून आजवरच्या परंपरेला अनुसरून याबाबतचे निर्णय घेतले जातात.

कोण आहेत न्यायमूर्ती?

१. सरन्यायाधीश रंजन गोगोई 

२. न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा 

३.न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी

४. न्यायमूर्ती बी.एस. गवई

५.न्यायमूर्ती रवींद्र भट

पाच न्यायमूर्तींनी सुनावणी करण्याचे नाकारले असल्याने आता या खटल्यात नेमके काय होणार याविषयीची उत्सुकता वाढली आहे.

@@AUTHORINFO_V1@@