संघाचा स्वयंसेवक , पक्षाचा निर्णय मान्य, एकनाथ खडसेंचा शरद पवारांना धोबीपछाड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2019
Total Views |

 

 

अफवांवर विश्वास ठेवू नका, कार्यकर्त्यांनी संयम पाळावा

 

जळगाव (प्रतिनिधी) : एकनाथ खडसे नेमका काय निर्णय घेणार आहेत, याची चर्चा सर्वत्र सुरु होती. दरम्यान, खडसे तीन महिन्यापासून आपल्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवारांनी केला होता. खडसे आता काय निर्णय करतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. यावर एकनाथ खडसेंनी अखेर भूमिका जाहीर केली आहे.


"मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज्ञाधारक स्वयंसेवक, पक्षाने घेतलेला निर्णय मला मान्य आहे", असे जाहीर वक्तव्य एकनाथ खडसेंनी केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, कार्यकर्त्यांनी संयम पाळावा, असे आवाहन एकनाथ खडसेंनी केले आहे. 

@@AUTHORINFO_V1@@