शिवसेना बैठकीत महिलेच्या कानशिलात, निगडी पोलिसात गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2019
Total Views |




पुणे (प्रतिनधी) : सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जोरदार धुमाकूळ सुरु आहे. अशातच पिंपरी चिंचवड येथे मात्र एक धक्कादायक प्रकार घडला. शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याने एका महिला पदाधिकाऱ्याच्या श्रीमुखात लगावली. याप्रकरणी शिवसेनचे माजी शहराध्यक्ष बाजीराव लांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित महिला पदाधिकारीने यविषयीची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. निगडी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.


विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी बाराच्या सुमारास इरफान सय्यद यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरु होती. तेव्हा सर्व कार्यकर्ते आपापली मते मांडत होते. त्याचवेळेला शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष बाजीराव लांडे तिथे आले. 'माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी हा मतदारसंघ भाजपला दिला आहे, शिवसेनेंचे त्यांनी वाटोळे केले', असे लांडे यांनी म्हटल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यावरूनच वाद उद्भवला आणि आढळराव समर्थक महिलेच्या, लांडे यांनी थेट कानशिलात लगावली.

त्यानंतर उपस्थित महिलांनी लांडे यांना चोप दिल्याचे सांगण्यात येत आहे. महिलांनीच त्यांना पोलीस ठाण्यात आणून दिले.

@@AUTHORINFO_V1@@