
मुंबई : आदित्य ठाकरे यांनी शक्तिप्रदर्शन करत वरळी विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती आहेत जे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे शिवसेनेने आता रिमोट कंट्रोलद्वारे सत्ता चालविण्याची परंपरा मोडीत काढली. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे यांनी आपल्या संपत्तीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार आदित्य ठाकरे यांच्याकडे एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे.
आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजपा-आरपीआय चा अधिकृत उमेदवार म्हणून वरळी विधानसभा मतदारसंघासाठी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 3, 2019
हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडवण्याची! pic.twitter.com/lgQFhY5gLb
युवासेनाप्रमुख @AUThackeray यांचा वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना काढलेल्या पदयात्रेला जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. pic.twitter.com/yLWaCZqadI
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 3, 2019
हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत रोड शो करत आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आदित्य यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे आणि लहान भाऊ तेजस ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते. ठाकरे कुटुंबातील कोणीही यापूर्वी निवडणूक न लढविल्याने त्यांच्या संपत्तीबद्दल फक्त तर्क वितर्कच चर्चिले जात होते परंतु आदित्यच्या उमेदवारीने याबाबतची माहिती समोर आली आहे.