बाळा नांदगावकर यांना हारण्याची भीती ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2019
Total Views |



मुंबई : मनसे विधानसभा निवडणूक लढविणार याबाबत अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी घोषणा केली होती. यानंतर मंगळवारी मनसेची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली. परंतु पहिल्या यादीत समावेश नसलेले बाळा नांदगावकर यांना दुसऱ्या यादीतही स्थान मिळाले नाही. मनसेने बुधवारी ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. परंतु राज ठाकरे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या बाळा नांदगावकरांना दुसऱ्या यादीतही स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आजच मनसेचे खंदे समर्थक समजले जाणारे नितीन नांदगावकर यांनीही आज शिवबंधन बांधले, यामुळे आता पक्षांतर्गत नाराजीचा सूर पक्षातून उमटत आहे.


बाळा नांदगावकर यांनी यापूर्वी २०१४ मध्ये शिवडी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा प्रभाव झाला होता. यंदा शिवडी विधानसभा मतदार संघातून संतोष नलावडे याना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात बाळा नांदगावकर यांची या मतदार संघावरील पकडही कमी झाली असल्याने त्यांना उमेदवारी दिली गेली नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिक मनसैनिकांनी इच्छा असूनही बाळा नांदगावकर यांचे यादीत नाव नसल्याने नांदगावकरांनी पराभव होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला का
? अशी शंका आता उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@