मुंबईत रंगणार बास्केटबॉलचा थरार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2019
Total Views |


खा. पूनम महाजन यांनी केले 'एनबीए'चे उपायुक्त मार्क टॅंटम यांचे स्वागत

 

मुंबई : भारतामध्ये बास्केटबॉलचे वेड पाहता आता नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए)च्या नंदीची सुरुवात मुंबईतून होणार आहे. अमेरिकेमध्ये लोकप्रिय असलेल्या बास्केटबॉल या खेळाचे प्रचंड वेड आहे. एनबीएने बास्केटबॉल रुजवण्यासाठी आता आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. यावेळेस सॅक्रॅमेंटो किंग्स आणि इंडियाना पेसर्स या अव्वल संघांमधील दोन प्रदर्शनीय सामने शुक्रवार आणि शनिवारी मुंबईत रंगणार असून त्याला चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

 

'एनबीए'चे प्रीसीझन सामने ४ व ५ ऑक्टोबरला सॅक्रेमेंटो किंग्ज आणि इंडियन पेसर्स संघादरम्यान खेळले जाणार आहेत. मुंबईतील एनएससीआय, एसव्हीपी स्टेङीयम येथे हे सामने आयोजित केले आहेत. तसेच, एनबीएचा सामना आयोजनाची संधी मिळणारा भारत हा आशियातील तिसरा देश ठरणार आहे. याआधी चीन व जपानमध्येही एनबीएचे प्री-सिझन सामने झाले आहेत. खासदार पूनम महाजन यांनी 'एनबीए'चे उपायुक्त मार्क टॅंटम यांचे मुंबईमध्ये स्वागत केले. यावेळी या नव्या खेळाच्या नदीबद्दल पूनम महाजन यांनी त्यांशी चर्चा केली.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@